मुंबई विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९.१८ वाजता एमिरेट्सच्या ईके ५०८ या विमानाने पक्ष्यांच्या थव्याला धडक दिली. त्यानंतर विमानाचे मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
सोमवारी रात्री उशिरा शोध सुरू असताना, सुमारे २९ फ्लेमिंगोंचे मृतदेह सापडले तर मंगळवारी सकाळी आणखी चार ते पाच मृतदेह सापडले. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत विमान कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मुंबई आणि नवी मुंबई किनाऱ्यालगतची पाणथळ जागा हे फ्लेमिंगोंचे प्रसिद्ध अधिवास आहेत. हे स्थलांतरित पक्षी डिसेंबरच्या आसपास या किनाऱ्यांवर येतात आणि मार्च आणि एप्रिलपर्यंत दिसतात. गेल्या काही काळात फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात आला आहे. यापूर्वीही नवी मुंबईत साईन बोर्डवर आदळून काही पक्षी मृत्युमुखी पडल्याचं समोर आलं होतं.