पुणे (पिंपरी) : संपूर्ण राज्यामध्ये सध्या पोलीस भरती सुरू आहे. या पोलीस भरतीला राज्यभरातून उमेदवार दाखल होत आहे. महिला आणि पुरुष या दोन्ही गटांमध्ये ही भरती केली जात आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवाराच्या तान्ह्या बाळाला चक्क महिला पोलीस सांभाळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सध्या याची चर्चा सुरू आहे.पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस महिला अंमलदाराने आपले कर्तव्य पार पाडत असताना तान्या बाळाला सांभाळले आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवाराला आपली परीक्षा व्यवस्थित देता आली. पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये सध्या २६२ पोलीस शिपाई पदांसाठी भरती सुरू आहे. भोसरी, इंद्रायणी नगर या भागामध्ये १९ जून ते १० जुलै या कालावधीपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा असल्याने काही दिवसांसाठी ही भरती प्रक्रिया बंद करण्यात आले होती. मात्र, पालखी पुढे गेल्याने ही भरती पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
शनिवारी पहाटेपासूनच पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया सुरू होती. यावेळी एक महिला उमेदवार आपल्या बाळाला घेऊन या ठिकाणी पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी आली होते. आपल्या बाळाला मैदानाच्या बाजूला ठेवून ती परीक्षेमध्ये उतरली होती. परीक्षा सुरू असताना अचानक बाळ रडायला लागले. बराच वेळ झाला तरी ते रडत होते. ही गोष्ट हे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अंमलदारांच्या लक्षात आली. नंतर या महिला पोलीस अंमलदाराने त्या बाळाला आपल्या कुशीत उचलून घेतले. त्यानंतर हे बाळ शांत झाले. नंतर संबंधित महिला उमेदवाराने आपली परीक्षा सुरळीत दिली.

परीक्षा व्यवस्थित पार पडल्यानंतर या महिला उमेदवाराने त्या पोलीस महिला अंमलदाराचे आभार मानले आहेत. मात्र, महिला पोलिसांच्या या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.