कोकणवासियांसाठी खुशखबर, रेल्वे प्रवाशांसाठी ३६ उन्हाळी विशेष एसी एक्स्प्रेस; असे आहेत थांबे

प्रतिनिधी, मुंबई : कोकण आणि मध्य रेल्वेने मुंबई ते कोकण मार्गावर ३६ विशेष वातानुकूलित एक्स्प्रेस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणवासीयांचा उन्हाळी सुट्टीतील रेल्वेप्रवास गारेगार होणार आहे. १५ तृतीय वातानुकूलित डबे आणि २ जनरेटर कार असे एकूण १७ डब्यांची रेल्वे गाडी असणार आहे. याचबरोबर मुंबई ते दानापूरदरम्यान दोन विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

कधी सुटणार?

गाडी क्रमांक ०१०१७ एसी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून २६ एप्रिल ते २ जूनदरम्यान दर मंगळवार, शुक्रवार, रविवारी रात्री १०.१५ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता थिवी येथे पोहोचेल. (१८ फेऱ्या)
शिवसेनेचे उमेदवार भाजप ठरवतंय, एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी मंत्र्याचा राजीनामा

परतीचा प्रवास?

गाडी क्रमांक ०१०१८ थिवी येथून २७ एप्रिल ते ५ जूनदरम्यान दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी दुपारी ४.३५ वाजता सूटेल आणि दुसऱ्या दिवशी एलटीटीमध्ये पहाटे ०३.४५ वाजता पोहोचेल. (१८ फेऱ्या)

असे आहेत थांबे

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड

(०१०११/२) एलटीटी-दानापूर विशेष एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता दानापूर येथे पोहोचणार आहे. या गाडीच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधता येईल.