बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धनकवडी, गुलाब नगर भागात मतदार यादीत प्रचंड गोंधळ असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक नावे डिलीट झाल्याचा दावा केला जात आहे. काही नावांमध्ये चुका आहेत. कुठे ज्येष्ठ नागरिकांची नावं वगळण्यात आली आहेत, एकाच कुटुंबातील महिलांची नावं मतदार यादीतून गायब आहेत, मात्र पुरुषांची नावं आहेत, अशा प्रकारचे आरोप अनेक तक्रारींमधून करण्यात येत आहेत.
याआधी, भोर आणि बारामती तालुक्यातही विरोधकाकडून पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचे प्रकार सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २३ लाख ७२ हजार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
बारामतीमध्ये गेल्या तीन निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. यंदा प्रथमच त्यांच्यासमोर घरातूनच कडवे आव्हान उभे राहिले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे या लढतीबाबत पहिल्या दिवसापासून उत्सुकता आहे.