कुठे ऑरेंज तर कुठे रेड अलर्ट जारी, १६ जुलैला महाराष्ट्रात ‘अशी’ असेल पावसाची स्थिती, हवामान खात्याने दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रायगडसाठी मंगळवारी रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच उद्या मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. याबाबत लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबले, तिथेच नियतीने दांपत्यासोबत डाव साधला, तीन लेकरं झाली पोरकी
महाराष्ट्रात अतिवृष्टीनंतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी-कार्जुवे, धामणी, कसबा या भागातील फणसवणे भागात पाणी तुंबले आहे, त्यामुळे या भागांमधील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्वांना सतर्क करण्यात आले आहे. यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केला आहे.नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ तासांत अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि सांगली जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्यातील दोन आठवडे, मुंबईने आधीच मासिक सरासरी पावसाचा कोटा ओलांडला आहे. रविवारी महानगरात महिन्यात ८६२ मिलिमीटर पाऊस झाला होता. दरवर्षी मुंबईत जुलै महिन्यात सरासरी ८५५.७ मिमी पावसाची नोंद होते. जूनमध्ये मान्सून सुरू झाल्यापासून रविवारी सकाळपर्यंत मुंबईत १,२०९ मिमी पाऊस पडला, त्यापैकी ८६२ मिमी पाऊस जुलैमध्येच नोंदवला गेला, असे IMD आकडेवारीवरून दिसून आले. यासह, शहराने जुलै महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. जी ८५५.७ मिमी इतकी आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी २,३१८ मिमी पाऊस पडतो, त्यात जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. यावर्षी मान्सून लवकर सुरू होऊनही मुंबईत जूनमध्ये ३४७ मिमी पावसाची नोंद झाली, जी जूनच्या सरासरी ५३७ मिमीच्या तुलनेत ३५ टक्के कमी आहे.