कापसासारखा रुबाबदार, इंदापूरचा सुपरस्टार, देशातील उंच घोडा सिकंदरचा हार्ट अटॅकने मृत्यू

पुणे : शेतकऱ्याच्या सर्वात जवळचा प्राणी म्हटलं तर बैलाचा उल्लेख होतो. तसेच लग्नकार्य म्हणा किंवा कोणता सोहळा म्हणा तर घोड्याचा उल्लेख केला जातो. पूर्वीच्या काळी घोड्यावरूनच अनेक ठिकाणी प्रवास केला जायचा. मात्र, आता ती परंपरा काळानुरूप नामशेष होत गेली. पण अद्यापही घोड्यांच्या शर्यती आणि मजा म्हणून घोड्यावरून सवारी केली जाते. पण याच घोड्यांना इतिहास काळात महत्त्वपूर्ण स्थान होते.आजही अनेक भागांमध्ये टांगा वापरला जातो. लग्नातही काही ठिकाणी घोडा किंवा घोडी वापरण्याची परंपरा कायम आहे. अशाच एका घोड्यासंदर्भात एक हृदयद्रावक बातमी इंदापुरातून समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावात निलेश अष्टेकर या शेतकऱ्याने लहानपणापासून सांभाळ केलेला नुकरा प्रजातीतील ‘सिकंदर’ नावाच्या घोड्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील शेतकरी निलेश अष्टेकर हे जिवापाड ‘सिंकदर’ या घोड्याचा साडेसात वर्षांपासून सांभाळ करत होते. काल शुक्रवारी सकाळी ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्याने अष्टेकर कुटुंबंतील सदस्य गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्याला संपूर्ण गावाकऱ्यांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.
अनेक महत्त्वाकांक्षी विधेयकं बासनात, मोदी सरकार ट्रॅक बदलणार, कोणकोणते विषय थंडबस्त्यात?

‘सिकंदर’ घोडा हा देशातीत उंच घोड्यांमध्ये त्याचा उल्लेख झाला होता. त्याचे वय साधारण ९ वर्ष इतके होते. ‘सिकंदर’च्या नावावर अनेक रेकॉर्ड देखील होते. निलेश अष्टेकर यांनी सांगितले की, ”सिकंदर हा एक सुपरस्टार आणि शानदार असा घोडा होता. त्याचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. पंजाबवरून त्याला आणण्यात आले होते. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे”. माणूस आणि प्राणी यांचे नाते नेहमीच राहिले आहे. त्यात घोडा, बैल आणि कुत्रा हे माणसाच्या अत्यंत जवळ असलेले प्राणी आहेत. घरातल्या सदस्यांप्रमाणे त्यांचा सांभाळ केला जातो. मात्र, त्यांचे निधन झाल्यानंतर हृदयाच्याजवळ असलेला व्यक्ती गेला असल्याची भावना मनात तयार होते. ‘सिकंदर’च्या जाण्याने अष्टेकर कुटुंबात दुःखाचे वातावरण आहे.

दरम्यान, तब्बल २५ वर्षे घोड्यांच्या उच्च जात कुळीचा अभ्यास केल्यानंतर निलेश अष्टेकर यांनी इंदापूर तालुक्यातील अकोले गावाची या स्टड फार्मसाठी निवड केली. त्यामध्ये अगदी तब्बल ६९ इंचापर्यंतच्या उंच घोड्यांची देखभाल करणे आणि त्यातून उच्च प्रतीची वंशावळ निर्माण करण्याचा प्रयोग त्याने सुरू केला. नुकरा, मारवाडी, काठेवाडी अशा विविध जाती सांभाळणे हे उच्च श्रीमंतीचे लक्षण समजले जाते. ‘सिकंदर’ला पाहायला राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून अश्वप्रेमी यायचे. या घोड्याला एका कंपनीने चक्क ७० लाख रुपयांची बोली लावली होती. हा घोडा प्रजननासाठी वापरला जातो त्याच्या एका वेळेच्या प्रजननाच्या प्रक्रियेचा खर्च ३१ हजार रुपयापर्यंत आकारला जायचा.