करकरे-कामटेंसंदर्भात पुरावे लीड न करण्यासाठी कुणी दबाव आणलेला का? आंबेडकरांचे निकमांना सवाल

मुंबई : उज्ज्वल निकम यांना विनंती करतो की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर दबाव असेल. आता आपण लोकसभेचे उमेदवार आहात आता कोणताही दबाव नाही. प्रामाणिकपणे निकम यांनी सांगावं की, त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का? की, करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे लीड करू नका अशा कोणी सूचना दिल्या होत्या का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, जसे परकियांकडून देशाच्या एकतेला धोका आहे, तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हटले आहे की, या देशात जयचंद किती निर्माण झाले आणि या भारताला स्वतंत्र अस्तित्व गमवावं लागलं त्याची उदाहरणे त्यांनी दिली आहेत.
Praful Patel : मोदींना शिवरायांचा जिरेटोप, सोशल मीडियावरील संतापानंतर पटेल नरमले, म्हणाले, यापुढे काळजी घेऊ
मी उज्ज्वल निकम यांना आवाहन करतोय की, २६/११ मध्ये काय घडलं आहे? हे लोकांना प्रामाणिकपणे सांगावे. आपण सांगितलेली व्यक्ती आणि संघटना या देशात जयचंदचे काम करणार का याबद्दल जनता निर्णय घेईल, असंही पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Pune Lok Sabha : पुणे लोकसभेत शेवटचा तास ‘बदलाचा’, नऊ टक्के मतं ठरवणार विजयाची समीकरणं, गणित काय?Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

२६/११ हल्ला झाला. त्या हल्ल्यामागील एक हल्ला आहे. ज्याने कोणी हल्ला केला त्याला माहिती होतं की, पाकिस्तान हल्ला करणार आहे. याचा अर्थ त्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. तो संबंध भाजप का उलगडत नाही? असा प्रश्न आंबेडकर यांनी भाजपला विचारला. तसेच, जनतेने उज्ज्वल निकम यांना विचारले पाहिजे की, तुम्ही राष्ट्राशी प्रामाणिक नाही तर आम्ही तुम्हाला का मतदान करावं? असाही सवाल त्यांनी केला.