औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर, राऊतांचा प्रश्न; उद्धव हसत म्हणाले… ‘सामना’च्या मुलाखतीचा टीझर

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यात मुंबईमधील सहा जागांसह राज्यातील १३ मतदारसंघात सोमवार २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘रोखठोक मुलाखत’ घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ‘निवडणुकांच्या महाभारतात नवे वादळ’ असे कॅप्शन याला देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग रविवार १२ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता प्रदर्शित होणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह वारंवार महाराष्ट्रात येत आहेत, आणि त्यांचं पहिल्या क्रमाकांचं टार्गेट हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार असल्याचं संजय राऊत बोलताना टीझरमध्ये पाहायला मिळतं, यावर लोकशाहीचं वस्त्रहरण होत असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे.
राज की उद्धव? कोणत्या ठाकरेंना प्रचार सांगतेसाठी छ. शिवाजी महाराज पार्क मैदान? अखेर फैसला समोर
संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे, या राऊतांच्या वक्तव्यावर ठाकरेंनी ‘नासवून टाकलंय’ असं उत्तर दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झाला आहे, या विरोधकांच्या वक्तव्याबाबत प्रश्नावर त्यांनी सूचक हास्य करत प्रतिक्रिया दिली. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसोबत गेल्याने औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झाल्याची टीका होतेय, या प्रश्नाच्या उत्तरालाही ठाकरेंनी हसत सुरुवात केली.
स्मिताताईंनी माझं काम केलं नसतं, तर आमदारही झालो नसतो, अनिल पाटलांकडून साटंलोट्याचे संकेत
मुसलमान, पाकिस्तान, कब्रस्तान, स्मशान या मुद्द्यांवर मोदी बोलत आहेत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधलं असता, आमच्या प्रचारात हिंदुस्तान आहे, असं ठाकरेंनी उत्तर दिलं. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा केलेय, असं संजय राऊत म्हणाले असता, म्हणूनच मी त्यांना व्हॅक्युम क्लीनर म्हणतोय, असं ठाकरे म्हणाले.

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

निवडणुकीत ‘राम-राम-राम’ म्हणणाऱ्यांकडे तुम्ही निवडणुकीनंतर जाता तेव्हा ते तुम्हाला ‘मरा-मरा-मरा’ म्हणत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांची शिवसेना म्हणजे ए सं शिं.. पूर्ण नावही मी घेऊ इच्छित नाही, महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद काय असतात, हे मोदीजींनी दहा वर्ष अनुभवलं, आता त्यांचा शाप काय असतो, हे पाहावं, असं उद्धव ठाकरे टीझरच्या शेवटी बोलताना पाहायला मिळत आहे.