उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा आज दिवस; बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, बावनकुळे अर्ज भरणार

राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात Image Credit source: Facebook

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज विविध पक्षांचे राजकीय नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात आज अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ हे देखील अर्ज दाखल करणार आहेत. सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात लढत होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. पण आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील अर्ज दाखल करणार

शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील दुस-यांदा अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी एक अर्ज दाखल केला होता. मोठ्या शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून हेंमंत ओगले तर शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहे. मनसेकडून राजेंद्र कापसे , तिस-या आघाडीकडून दीपक त्रिभुवन हे देखील अर्ज दाखल करणार आहेत.

नेवासा विधानसभासंघातून शिवसेना शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंघे अर्ज दाखल करणार आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडुन संदीप वर्पे अर्ज दाखल करणार आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडुन अमित भांगरे अर्ज दाखल करणार आहेत.

बावनकुळे आज अर्ज भरणार

भाजपचे प्रदेशाध्यक्षचंद्रशेखर बावनकुळे आज स्वतःच्या सहीने एबी फॅार्मसह उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 2019 च्या निवडणुकीतील तो क्षण आठवला आणि बावनकुळे यांच्या डोळ्यात पाणी आलं, ते भावूक झाले. 2019 ला तिकीट कापलेल्यानंतर आता बावनकुळे आज स्वतःच्या सहीच एबी फॅार्मसह उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कामठी विधानसभेतील प्रत्येक परिवाराशी माझे जवळचे संबंध आहेत. महायुतीचं सरकार राज्यात येणार आहे. कर्ज म्हणून मी मतं घेणार आहे आणि पाच वर्षे त्याची परतफेड करणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्याने मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मी नशिबवान आहे. माझ्या सहीच्या एबी फॉर्मने मी निवडणूक अर्ज भरणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)