मुंबई: माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… बाळासाहेबांची ही गर्जना मला आठवते. हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण इंडिया आघाडीची बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी सांगितलं हे चालणार नाही. ते बदला. तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव असे शब्द ऐकायला मिळत आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं आहे. ते शिवाजी पार्कमधील महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
महायुतीकडून आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य प्रचारसभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधल्याचे पहायला मिळाले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांची आठवण काढली. ते म्हणाले की, शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेबांची गर्जना आठवते. ते म्हणायचे माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यांनी सांगितलं हे चालणार नाही. ते बदला. तेव्हापासून त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलं. ही शोकांतिका आहे. बाळासाहेबांची सभा व्हायची. शिवसेनेचा भगवा झेंडा, कडवट हिंदू असं म्हटलं जायचं. आदर्श , शिवरायांचे मावळे असे शब्द ऐकायला मिळायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, अर्धवटराव, माझं कुटुंब माझी जबाबदारी यापलिकडे काही ऐकायला येत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जी महायुती तयार झाली आहे. मुंबईत दहा वर्षात परिवर्तन पाहिलं. ते परिवर्तन, मुंबईचा बदललेला चेहरा, मेट्रो, अटल सेतू, मिळणारं घर, धारावीचा विकास आम्ही सांगतो. इंडिया आघाडीवाल्यांनो तुम्ही काय सांगू शकता. तुम्ही एक तरी काम दाखवा, असं म्हणत फडणवीसांनी इंडिया आघाडीला आव्हान दिले आहे. कोरोना काळात मोदींनी देशाला कोविड लस दिली. मोदी कोविड लस देत होते, तेव्हा उद्धव ठाकरे खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा करत होते, असा घणाघाची आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.