आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितले होतं, तेव्हा पवार साहेबांनी अख्या कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेतली होती- अजित पवार

इंदापूर (दीपक पडकर): काही जण म्हणतात की, अजित पवारांनी या वयात पवारांची सोबत सोडायला नको होती, अशी पारावर बसून चर्चा होत आहे. मात्र मी तुम्हाला सांगतो. मी साहेबांना कधीही सोडलं नाही. १९८७ पासून २०२३ पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा, त्यानुसार मी काम केले. आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितले होते, आपले सर्व कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचे होते. स्वर्गीय वसंतदादा हे त्यावेळी निवडणुकीला उभे होते. त्यावेळी पवार साहेब महाविद्यालयीन विद्यार्थी होते. तेव्हा साहेबांनी त्यांना विरोध केला. पवारांचे अख्ख कुटुंब स्वर्गीय वसंत दादा पवारांच्या बाजूने होते. मात्र पवार साहेबांनी तेव्हा विरोधी भूमिका घेतली. ही सुरुवात होती, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित सभेत पवार बोलत होते.
आत्मे भटकत असतात; नरेंद्र मोदी दिल्लीत असले तरी, त्यांचा आत्मा देशभर फिरतोय- रामदास आठवले

पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वर्गीय वसंतदादांच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ साली पवार साहेबांना संधी दिली.या व्यासपीठावर बसणाऱ्या प्रत्येकाला कोणी ना कोणी संधी दिली आहे. मलाही पवार साहेबांनी संधी दिली. १९७८ला कार्यरत असणारे वसंतदादांचे सरकार पाडले आणि पुलदला घेऊन सरकार बनवले. त्यावेळेस पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचे ऐकले नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचे ऐकले नाही. पुढे काही काळानंतर आम्हाला सांगण्यात आले समाजवादी काँग्रेस, काँग्रेस आय मध्ये विलीन करायचे. त्यानंतर १९७८ला पवार साहेब मुख्यमंत्री झाले.

भटकती आत्मा पंतप्रधान कुणाला म्हणाले? अजित पवार उत्तर मागणार


कुटुंबातील सदस्यांना सुनावले…

माझ्या तालुक्यात तर अनेक जण लोकांकडे जाऊन जाऊन त्यांना नको नको केले आहे. त्यांना फोन करून सांगतात, मी तुमच्या घरी जेवायला येणार आहे. मात्र काय काय सांगतात.. तुम्ही आता जेवायला येऊ नका, सात तारीख आहे नंतर जेवायला या…पोशाख पण करतो, जेवण पण घालतो, सर्व काही आदरातिथ्य करतो, हे सर्व माझ्या तालुक्यात चालू आहे.
मतदान संपल्याबरोबर काँग्रेसमध्ये खळबळ; दोघांचे निलंबन, शिवानी वडेट्टीवार यांच्यासह ४९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस

माझ्या निवडणुकीच्या वेळी कधी असे काम केले नाही. आता पायाला भिंगरी लावून सगळीकडे फिरत आहेत. मात्र मला त्यांना सांगायचे आहे की, आपल्याकडचा पवारांचा जुना इतिहास असा आहे की, १९६२ ला एकच जण एका बाजूला होता आणि अख्ख घराणे एका बाजूला, तरीही घराणे प्रचार करत असताना शीट पाडली. आणि एकटा माणूस असणार शीट जिंकून आली. तसे आता पण होणार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या सदस्यांना सुनावले.