आधी बारामतीकरांचं कौतुक, नंतर सत्ताधाऱ्यावर निशाणा, शरद पवारा नेमकं काय म्हणाले?

दीपक पडकर, बारामती: बारामती लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष होते. अनेक गोष्टी छापून येत होत्या. टीव्हीवर दिसत होत्या. मी शांत होतो. कारण मला माहिती आहे की, बारामतीकर शहाणे लोक आहेत. तो शहाणपणा बघायला मिळाला, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीकरांचे कौतुक केले. पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण १२५० बूथ होते. पैकी ११९० बूथ वरून बारामतीकरांनी आमच्या बाजूने मतदान केले. मग आता म्हणायचं की नाही बारामतीकर शहाणे आहेत. १९६७ पासून आजपर्यंत मी तुम्हा लोकांचा शहाणपणा बघत आलो आहे. अनेक पिढ्यांपासून हा शहाणपणा कायम आहे. या शहाणपणापासून बारामतीकर कधीही दूर गेले नाहीत.
महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना एकत्र आणा, मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व स्वीकारा अन्यथा आंदोलन करू, गायकर यांचा इशारा
मला निवडणुकीच्या आधी असं वाटायचं की राम मंदिर झालं. हा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा असेल. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाकडे कल राहील. मात्र आपल्या देशातील लोक समंजस आहेत. मंदिराच्या नावाने तुम्ही मत मागता म्हणजे लोकांनी वेगळा निकाल दिला. राम मंदिर ज्या आयोजित बांधले. तेथेच भाजपचा पराभव झाला. या मुद्द्याची भीती आम्हाला वाटत होती. मात्र मंदिराचं राजकारण कसं दुरुस्त करायचं. हे तेथील जनतेने केले. या देशातील लोकशाही जी टिकून आहे ती आम्हा लोकांमुळे नव्हे तर. या देशातील सामान्य माणसाच्या शहाणपणामुळे टिकून आहे. गेली दहा वर्ष राज्यकर्ते टोकाची भूमिका घेत होते. त्या राज्यकर्त्यांचे जमिनीवर पाय टेकवले पाहिजे. हा संदेश देशातील जनतेने दिला, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, यंदाच्या लोकसभेचा निकाल हा वेगळ्या पद्धतीचा झाला. सरकार बनलं, मंत्र्यांचा शपथविधी झाला. देशात स्थैर्य येईल. निवडणुका येतात आणि जातात. मात्र या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर कशी राहील. याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुक निकालाचे चित्र पाहिले तर गेल्या निवडणुकीच्या पाच वर्षांपूर्वी आज सत्तेत आले त्यांना ३०० पेक्षा जास्त जागा लोकांनी निवडून दिल्या होत्या. यंदाच्या वर्षी तो आकडा २४० वर आला. त्यांच्या ६० जागा कमी झाल्या. असेही पवार म्हणाले. अमेरिकेतील सर्वात महत्त्वाचे शहर असणाऱ्या न्यूयॉर्कमध्ये बारामतीच्या निवडणुकीची चर्चा होती. त्यामुळे तुम्ही काय साधे लोक आहात काय.. तुम्ही कुठे जाऊन पोहोचलात. ही चांगली गोष्ट आहे, असं पवार म्हणाले.