पुणे पोर्श कार अपघाताबाबत न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. अल्पवयीन आरोपींनी पीं कोझी बारमध्ये कोणत्या खात्यातून पैसे भरले होते, याची माहिती आम्हाला मिळवायची आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी विशाल अग्रवालविरुद्ध फसवणुकीचे कलम ४२० जोडण्यात आले आहे. आलिशान पोर्श कार ब्रह्मा लीजरच्या नावाने खरेदी करण्यात आली होती. या प्रकरणी अधिक माहिती गोळा करायची आहे. एवढेच नाही तर सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विशाल अग्रवालच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
न्यायालयाने सांगितले की, आरोपी नंबर सहा म्हणजे विशाल अग्रवाल याच्या पोलीस कस्टडीची गरज नाही. कारण आरोपी अग्रवालचा मोबाईल फॉरेन्सिकला पाठवला आहे. विशाल अग्रवालच्या पोलीस कस्टडीची गरज नाही. तसेच विशाल अगरवाल याला 41A ची नोटीस दिली नाही आणि अटक केली. अल्पवयीन मुलाने अपघात केला तर वडिलांना 41A ची नोटीस देऊन ताब्यात घेण्याची प्रोसेस आहे. पण ती पोलिसांनी केली नाही, असं न्यायालयाचे म्हणणं आहे. विशाल अग्रवाल आणि अन्य पाच आरोपींना ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासासाठी पोलीस कोठडी वाढविण्याची फिर्यादीची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. आरोपींमध्ये दारुची सेवा देणाऱ्या दोन आस्थापनांचे मालक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जेथे वेदांतने दारुचे सेवन केले होते.