आधीच्या योजना काढून बघा, अंमलबजावणी झालीये का? विधानसभेची जनता वाट बघतीये, ठाकरेंनी सुनावले

मुंबई : महायुतीला लोकसभा निवडणुकांत जनतेने जोरदार दणका दिलाय. यांचे डोळे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत. त्यामुळे निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सादर केलेल्या अर्थसंकल्पाला सुजाण जनता भुलणार नाही. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर आहे तसेच सगळ्याच घटकाला जोडून घेण्याचे खोटे नरेटिव्ह सरकारने तयार केले. भगिणींसाठी योजना आणली तर भेदभाव न करता मुलांसाठीही योजना आणायची होती. अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचं आवताण, जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या अर्थसंकल्पावर केली.

शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला असल्याचे अजित अजित पवार यांनी सांगितले. मात्र दादांचा हा दावा खोडून काढताना निवडणूक आल्यानंतर अशा घोषणा केल्या जातात, लबाडा घरचं आवताण, जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, असे ठाकरे म्हणाले.
महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० हजार रुपये देणार, वर्षाला तीन सिलेंडर मोफत, अजित पवार यांची मोठी घोषणा

आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर

इथली जनता सुजाण आहे. यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेला आहे. राज्याला ओरबडून, जनतेला फसवून सत्ता मिळवायची, हेच यांचे धोरण आहे. लोकसभेत दणका बसल्यानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी घोषणा केल्या. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर आहे तसेच सगळ्याच घटकाला जोडून घेण्याचे खोटे नरेटिव्ह यांनी सेट करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका ठाकरे यांनी केली.
शेवटचे अधिवेशन वादळी? लोकसभेच्या यशानंतर महाआघाडीचे नेते आक्रमक, घोषणांचा पाऊस

अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद कशी करणार ते आधी सांगा

घोषणा जाहीर करताना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद कशी करणार, हे त्यांनी सांगायला हवे होते. आजपर्यंत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली का? हे तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करा, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले. अनेक योजना अशा आहेत, ज्यांच्या घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात आल्या नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

भेदभाव नको, मुलांसाठी का योजना आणली नाही?

महिलांसाठी लाडकी योजना आणत असाल तर भेदभाव करू नका, मुलांसाठीही आणा, असेही ठाकरे म्हणाले. हा अर्थसंकल्प आहे की जुमला आहे? असा प्रश्न राहूनराहून पडतोय कारण. १५ लाख देणार म्हणून सांगितले आणि निवडणुकीनंतर हा जुमला असल्याचेही सांगितले गेले. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना जनता पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.