पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात पडलेली फूट यानंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये सुप्रिया ‘ताईं’साठी राबलेले अजित’दादा’ आता त्यांच्या पराभवासाठी इरेला पेटले आहेत. पक्ष, चिन्हापाठोपाठ आता अजित पवारांनी मैदानही मारल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रचारसभेसाठी नवं मैदान शोधावं लागलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघावर शरद पवारांचं अनेक दशकांपासून वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची अंतिम सभा शरद पवार ख्रिश्चन कॉलनीमधील मैदानात घेतात. गेल्या ४० वर्षांपासून यात खंड पडलेला नव्हता. मात्र यंदा शरद पवारांना प्रचाराची अंतिम सभा ख्रिश्चन कॉलनीमधील मैदानात घेता येणार नाही. कुटुंबासोबत दुपारचं जेवण आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधन ही परंपरा शरद पवारांनी ४० वर्षांहून अधिक काळ सुरू ठेवली. यंदा मात्र तसं घडणार नाही.
ख्रिश्चन कॉलनीमधील मैदान एका खासगी ट्रस्टच्या मालकीचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे मैदान सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बूक केलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवार या मैदानात सभा घेतील. अजित पवारांनी ख्रिश्चन कॉलनीमधील मैदान बूक केल्यामुळे शरद पवारांनी नव्या मैदानाचा शोध सुरू केला. त्यांचा शोध कसब्यात संपला. कसब्यातील जुन्या मोरगाव रोड परिसरात असलेल्या मैदानात शरद पवारांची सभा होईल. या सभेनंतर सुळेंच्या प्रचाराची सांगता होईल.
शरद पवारांच्या विचारसरणीवर ठाम असलेले कार्यकर्ते नव्या मैदानात जमतील. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला असलेला भरघोस पाठिंबा नव्या मैदानात दिसेल, असा विश्वास कर्जत-जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी व्यक्त केला. ‘आमचा पक्ष आणि चिन्ह चोरीला गेलं आहे. त्यानंतर आता ४० वर्षांपासून सांगता सभा होत असलेलं मैदान आमच्याकडून हिसकावण्यात आलं आहे. पण पवार साहेबांचे विचार मानणारा माणूस अद्यापही साहेबांसोबत आहेत. तो हिसकावून घेता येणार नाही, याची त्यांना कल्पना नाही,’ असं रोहित पवार म्हणाले.

सुळेंच्या प्रचाराची सांगता सभा ५ मे रोजी दुपारी अडीच वाजता होईल. ‘लोकांनी मोठ्या संख्येनं रॅलीसाठी यावं. सध्या उन्हाचा कडाका जास्त आहे. त्यामुळे येताना काळजी घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं. ‘पक्ष, चिन्ह घेतलं. त्यानंतर मैदानही घेतलं,’ अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळेंनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांवर टीका केली होती. ‘घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. ख्रिश्चन कॉलनीमधील मैदानात सभा घेऊन प्रचाराची सांगता करण्याची परंपरा शरद पवारांनी सुरु केली. अजित पवार राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी ही प्रथा सुरू केली होती,’ याची आठवण सुळेंनी करुन दिली.