अनिश अवधियाची आई सविता यांच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नाहीये. महिन्याभरापूर्वी भेटलेला लेक आता परत कधीच दिसणार नाही हे त्यांना सहन होत नाहीये. “त्याने माझ्या मुलाचा जीव घेतला. आता मी माझ्या मुलाला कधीही भेटू शकणार नाही”, अस म्हणत ही माऊली धाय मोकलून रडली.
ही त्या मुलाची चूक होती आणि ती हत्या होती. कारण त्याने एवढी मोठी चूक केली नसती तर आज कोणाचाही जीव गेला नसता. त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याला वेळीच थांबवलं असतं तर आज माझ्या मुलाचे प्राण वाचले असते. ही हत्या आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच, याप्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोपही त्यांनी पुणे पोलिसांवर केला आहे. पैसे असलेले लोक त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारकडे त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.
४ मे रोजी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यासाठी तो घरी आला होता. तेव्हा मी त्याला अखरेची भेटले. तो दुबईहून माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आला होता. म्हणत होता मी लवकरच भेटायला येईल, पण आता तो मला कधीच भेटणार नाही, असं म्हणत त्यांनी एकच टोहो फोडला.
मला त्याच्या मित्राचा फोन आला होता. तो म्हणाला काकी अनिशचा अपघात झाला आहे, तुम्ही लवकर या आणि यानंतर मी काहीच ऐकू शकली नाही. माझी हालतच नव्हती की मी काही समजू शकेल. मी एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. मला ब्रेन ट्युमर आहे, त्यामुळे मला कधीही काहीही होऊ शकतं, मी हे दु:ख कसं सहन करु, सविता हे सांगत असताना उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.