आता फक्त दाऊदला क्लिन चीट मिळणं बाकी असल्याचं म्हणत त्यांनी वायकरांवर टिका केली आहे. पुढे ते असंही म्हणाले, ‘रविंद्र वायकरांनी ईडीच्या भीतीने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात सामील झाले. आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे काही लोक घाबरून त्याच्याकडे जातात. हे सरकार भ्रष्टाचारी आपल्याकडे घेत असून आमची ताकद वाढल्याचं सांगत आहेत,’ अशी टीका राऊतांनी महायुती सरकारवर केली.
संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील भीतीमुळेच त्यांच्यासोबत गेले असल्याचा टोलाही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
लालू प्रसाद यादवांच्या विधानावर काय म्हणाले संजय राऊत
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी नुकताच केंद्रातील एनडीए सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचं तसंच सरकार पडण्याचा दावा केला होता. त्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी राऊत प्रसाद यादव जे काही बोलले ते योग्य बोलले असल्याचं म्हणाले, हे सरकार अधिक काळ चालणार नसल्याचं राऊत म्हणाले.
रविंद्र वायकर प्रकरणात काय म्हणाले मुंबई पोलीस?
जोगेश्वरी इथे एका अलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणात वायकर आणि त्यांच्या पत्नी अडचणीत आले होते. त्यानंतर रविंद्र वायकर यांच्या विरोधातलं भूखंड घोटाळ्यातील प्रकरण हे अपुरी माहिती आणि गैरसमजुतीने दाखल झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यांच्या विरोधात मुंबई महापालिकेने केलेली तक्रार अपूर्ण माहितीवरुन देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.