पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर नागिरकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला. ३०० शब्दांच्या निंबधावर कोणाला जामीन कसा मिळू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्यानंतर राज्य सरकारकडून पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवालला अटक केली. पण, दोन जीव घेणारा आरोपी फक्त अल्पवयीन असल्याने त्याला जामीन कसा काय मिळू शकतो हा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
त्याबाबत आता मोठी महिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीला जामीन देताना कोर्टात नेमकं काय घडलं?
अल्पवयीनला कुठल्या अटींवर जामीन मंजूर?
- अल्पवयीन आरोपीला घडलेल्या घटनेवर ३०० शब्दांचा निबंध लिहावा लागेल.
- अल्पवयीन आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
- अल्पवयीन आरोपीला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
- अल्पवयीन आरोपीला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.
‘मी नातवाची गॅरंटी देतो’
जेव्हा कोर्टात याप्रकणाची सुनावणी झाली तेव्हा अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी आपल्या लाडक्या नातवाला जामीन देण्यासाठी त्याची गॅरंटी घेतल्याचं समोर आलं आहे. यापुढे नातू अभ्यासात लक्ष देईल, वाईट संगतीपासून लांब राहिल अशी गॅरंटी त्याच्या आजोबांनी कोर्टात दिली होती. त्याच आधारे त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.