कसा झाला अपघात?
कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे येथे मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम करून तासगाव येथील ६० वर्षीय इंजिनीयर राजेंद्र पाटील हे कुटुंबीयांसह तासगावकडे परतत असताना आक्रित घडलं. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तासगाव ते मनेराजुरी रस्त्यावर आल्यानंतर कार चालवत असलेल्या राजेंद्र पाटील यांचा कारवील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट चिंचणी हद्दीतील ताकारी कालव्यात जाऊन कोसळली.
या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक स्वप्नाली गंभीर जखमी झाली. दुर्दैवी गोष्ट म्हणजे ती रात्रभर गाडीत बसून होती. रस्त्यावर कोणीही नसल्याने ती मदतीपासून वंचित राहिली. आजूबाजूला सहा जीवलगांच्या मृतदेहांच्या सान्निध्यात तिने अख्खी रात्र काढली.
पहाटे अपघाताची घटना उघड
सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना उघडकीस आली. स्वप्नालीवर तासगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सहाही जणांचे मृतदेह तासगाव ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे समजते. कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने तासगांववर शोककळा पसरलीय.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मृत आणि जखमींची नावे
मृत
कार चालवत असलेले अभियंते राजेंद्र जगन्नाथ पाटील, वय ६० वर्ष
पत्नी सुजाता राजेंद्र पाटील, वय ५५ वर्ष
मुलगी प्रियांका अवधूत खराडे, वय ३० वर्ष
नात ध्रुवा वय तीन वर्ष,
राजवी वय दोन वर्ष,
कार्तिकी वय एक वर्ष,
जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले वय ३० वर्ष रा. कोकळे