आईस्क्रीममध्ये मानवी बोट, फूड अथॉरिटीकडून पुण्यातील उत्पादकाचा परवाना रद्द; प्रकरण काय?

मुंबई : मुंबई मालाड पश्चिम येथील एका २६ वर्षीय डॉक्टरने बुधवारी आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोट सापडल्याचा आरोप केल्यानंतर FSSAI पश्चिम विभागीय कार्यालयाने पुण्यातील एका आईस्क्रीम उत्पादकाचा परवाना निलंबित केला आहे.एफएसएसएआयच्या पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने आइस्क्रीम उत्पादकाच्या जागेची तपासणी केली असून त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, असे एफएसएसएआयने एएनआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. मात्र, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अद्याप आलेला नाहीय. FSSAI पुढे म्हणाले की, आईस्क्रीमची डिलिव्हरी करणारा आईस्क्रीम उत्पादक पुण्यातील इंदापूर येथील आहे आणि त्याच्याकडे केंद्रीय परवानही देखील नाही, FSSAI ने सांगितले.
निवृत्तीवय साठ वर्षे करण्यावर मुख्यमंत्री सकारात्मक, मागण्यांची पूर्तता लवकर करण्याचे दिले आश्वासन

पुढील तपास पथकासाठी FSSAI ने विक्रेत्याच्या आवारातून नमुने गोळा केले आहेत. राज्य एफडीएने मुंबईतील विक्रेत्याच्या जागेचीही तपासणी केली आहे आणि बॅचचे नमुने घेतले आहेत. अन्न सुरक्षा मंडळाने सांगितले की, तक्रारदारच्या म्हणण्यानुसार त्याच्या बहिणीने त्याला भेट दिली आणि ते आईस्क्रीम किराणा ॲपद्वारे युम्नोकडून तीन आईस्क्रीम ऑर्डर केल्या त्या रात्री १० वाजता घरी पोहोचल्या. त्याच्या पोलिस तक्रारीत, त्याने म्हटले आहे की, त्याने एक घास घेतल्याने त्याला त्याच्या तोंडात काहीतरी असामान्य वाटले आणि जेव्हा त्याने ते नीट तपासले तेव्हा त्याला बोटासारखे मांस दिसले. नंतर, त्याने फोटो क्लिक केला आणि कंपनीच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला.