गजानन कीर्तिकर काय म्हणाले?
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाविषयी ठाकरे गटाच्या मनात असलेल्या संशयाविषयी गजानन कीर्तिकर यांना विचारलं असता, ते म्हणाले की “मी अमोलला सांगितलं, त्याच्या उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, तुमच्या मनात मतमोजणीच्या कृतीविषयी किंवा आरओ (रिटर्निंग ऑफिसर) च्या आक्षेपार्ह कृतीविषयी जो संशय आहे, त्या विषयी आता वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमातून चर्चा करण्यात अर्थ नाही. तुम्ही सरळ कोर्टात जा, कोर्टाकडे दाद मागा, जो काय निर्णय होईल तो स्वीकारा.”
आरओ वंदना सूर्यवंशींवरही संशय
“आता या चर्चेला अर्थ नाही, ४८ मतांनीच का जिंकले… एक गोष्ट या निमित्ताने स्पष्ट होते, की रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी या ज्या पूर्व खात्यात होत्या, तिथे त्यांच्यावर काही आरोप होते, अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आरओ म्हणून नियुक्त का केलं? निवडणूक आयोगाचे काही संकेत किंवा नियम आहेत, की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांची अशी नेमणूक करता येत नाही, त्यांना याचा जाब द्यावा लागेल. त्यामुळे कोर्टात दाद मागावी” असा सल्ला गजाजन कीर्तिकर यांनी दिला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मी त्यांचा जो आक्षेप आहे, जो आरोप आहे, त्या डिटेलमध्ये गेलो नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, माझा मुलगा असला तरी मी मतप्रदर्शन करणार नाही. हा तांत्रिक लीगल मुद्दा आहे, पोलिसांचा तपास करण्याचा मुद्दा आहे, मी माझा स्वतःचं मत मांडू शकत नाही, त्यांनी कोर्टात सांगावं, त्यांचे दावे हरकती जे काही आहे, ते कोर्टात मांडावे आणि कोर्ट जो निर्णय देईल तो शिरसावंद्य मानावं, असंही कीर्तिकर म्हणाले.