मुंबई : अंधेरीच्या वर्सोवा येथील सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यासह वरिष्ठांच्या आदेशानुसारही कारवाईकडे काणाडोळा, इतर कामकाजात निष्काळजी केल्याप्रकरणी महापालिकेच्या के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यासह पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांची बदली केली आहे. महापालिका आयुक्तांनी समक्ष बैठकीत उपस्थित राहण्याची सूचना केल्यानंतरही गैरहजर राहिल्याबद्दल शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.के पश्चिम विभागात २०२२पासून सेवेत असलेले सोमेश शिंदेकडे प्रभाग क्र. ५९,६०, ६३चा कार्यभार सोपविण्यात आला होता. यातील प्रभाग ५९, ६३ मध्ये अवैध बांधकामे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरफार, वर्सोव्यातील दलदलीच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामाविषयी पालिकेकडे तक्रारी येत होत्या. सहआयुक्त विश्वास शंकरवार, के विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी तक्रारींची दखल घेत त्यावर कारवाई करण्यासाठी शिंदे यांना सातत्याने सूचना केल्या होत्या. त्यांना संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्सोव्यातील अधिकृत बांधकामाविषयी महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त पालिका आयुक्तांना माहिती देत ३ जूनला कारवाई करण्याचे नियोजन केले होते. त्याचे आदेश मिळाल्यानंतरही शिंदे यांनी त्यासाठी कोणतीही तयारी केली आहे.
३ आणि ४ जून रोजी प्रत्यक्ष कारवाईवेळी शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली. सहआयुक्त, सहाय्यक आयुक्तांसह अन्य अधिकारी उन्हात कारवाई करत असताना शिंदे खासगी वाहनात एसी सुरू करून बसून राहिले होते. ही कारवाई पूर्ण होण्याआधी ते निघून गेले. प्रत्यक्षात ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कारवाई पूर्ण होण्याआधीच ते निघून गेले. विशेष म्हणजे, ही निष्कासन कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती व तोवर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यानंतर ५ जूनला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी पाहणी दौऱ्यावर असताना सोमेश शिंदे, स्वप्नील कोळेकर यांना के पूर्व विभाग कार्यालयात बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. तेव्हा शिंदे यांनी गैरहजर राहत पालिका आयुक्तांच्या निर्देशांचेही उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे, शिंदे यांची कार्यालयात अनुपस्थिती, इतर कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे, नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई न करण्यासारख्या असंख्य तक्रारींबाबत त्यांची चौकशी सुरू आहे. त्याची दखल घेत कामकाजातील बेजबाबदार, निष्काळजीपणा, पालिकेची प्रतिमा मलीन होण्यासारख्या कारणांसाठी खात्याअंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे.

अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी विशेष पथक
वर्सोव्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. त्यात पथकप्रमुख म्हणून प्रभारी पदनिर्देशित अधिकारी अशोक अदाते, सहाय्यक अभियंते पंकज बनसोड, दुय्यम अभियंता जयेश राऊत, दुय्यम अभियंता परेश शहा, दुय्यम अभियंता सिद्धार्थ अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.