पुणे: पुण्यातील कल्याणीनगरात भरधाव पोर्शे कारनं शनिवारी रात्री दुचाकीला धडक दिली. त्यात दोन तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. पोर्शे कार चालवणारा मुलगा अल्पवयीन होता. कारची नोंदणी झालेली नव्हती. अपघात होण्यापूर्वी मुलगा एका पबमध्ये गेला होता. तिथे त्यानं मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुलाचा बाप विशाल अग्रवालला अटक केली आहे. काल या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद झाला. न्यायालयानं अग्रवालला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विशाल अग्रवालनं त्याचा स्मार्टफोन लपवला आहे. आपण बेसिक कीपॅड फोन वापरत असल्याचा दावा तो करतो. पोर्शे कारचा मालक कीपॅड फोन वापरत असेल यावर विश्वास ठेवणं अवघड असल्याचा युक्तिवाद पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आला. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं बुधवारी न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली. ‘गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे वडील फरार झाले, त्यांना पुणे शहर सोडलं. ते नॉट रिचेबल झाले. त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. तपास करताना त्यांचं लोकेशन छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळलं. तिथूनच त्यांना अटक करण्यात आली. मग पुण्यात आणण्यात आलं,’ असा घटनाक्रम पुणे पोलिसांनी न्यायालयाला सांगितला.
‘विशाल अग्रवाल प्रामाणिकपणे माहिती देत नाहीत. ते दिशाभूल करत आहेत. अपघात झाल्यानंतर आम्ही त्याच्यांशी संपर्क साधला. आपण शिर्डीत असल्याचा दावा त्यांनी केला. पण प्रत्यक्षात ते पुण्यात होते. मग ते छत्रपती संभाजीनगरला गेले. तिथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी स्मार्टफोन लपवल्याचा संशय आहे. आपण नोकियाचा बेसिक फोन वापरत असल्याचा दावा ते करतात. जो माणूस पोर्शे कार वापरतो, त्याच्याकडे ८०० रुपयांचा फोन आहे, यावर विश्वास ठेवणं अवघड आहे,’ असं पोलीस निरीक्षक माने यांनी न्यायालयाला सांगितलं. न्यायमूर्ती एस. पी. पोंक्षे यांच्याकडे त्यांनी अग्रवालला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

नोकिया फोनमध्ये असलेलं सिम कार्ड १९ मे रोजी विकत घेण्यात आलं. तपासाची दिशा भरकटवण्यासाठीच नवा फोन आणि सिम कार्ड घेण्यात आलं असावं अशी शंका घेण्यास वाव आहे. अग्रवाल यांचा फोन मिळणं गरजेचं आहे. या कालावधीत त्यांनी कोणाला कॉल केलं होते, ते कळायला हवं. तपासाच्या दृष्टीनं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, असं पोलीस निरीक्षक माने न्यायालयात म्हणाले.