भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या प्रसंगी अजित पवार बोलत होते.
मी सकाळी सहा वाजता उठून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जिथे कुठे मुक्कामाला असेल त्या ठिकाणी मी सहा वाजता उठून कमला लागतो, मला ती काम करण्याची आवड आहे. मी १९९१ला खासदार असताना पिंपरी चिंचवडचा येवडा बदल करून दाखवला, याचा अर्थ आम्ही काम करतो, ढगात गोळ्या मारत नाही वेळ मारून नेहेत नाही, आम्ही खोट बोलत नाही. “तुम्ही मला नोवडणून द्या मी २०१९ पर्यंत एमआयडीसी करीन” (असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची मिमिक्री केली) तरी देखील माणूस पुन्हा २०१९ला मत मागायला येतो. माझ्या सारख्याला तर शरमच वाटली।असती, लाजच वाटली।असती, की बाबा कुठल्या तोंडून मी मत मागायला जाऊ, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर तिखट शब्दात प्रहार केला. पुढे ते असंही म्हणले मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे. मी सहसा शब्द देत नाही आणि दिला तर पूर्ण करायला कोणच्या बापाला ऐकत नाही, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या टीका करताना भोर तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोर तालुक्यात गेले अनेक दिवस एमआयडीसीच आश्वासन स्थानिक लोकांना दाखवलं जात आहे. परंतु पूर्ण होत नाही, परिणामी लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा समोर आलं आहे. मात्र आता याचा फटका सुप्रिया सुळे यांनी कित्पाद बसत्यो हे पाहणं महत्वाचं असेल.