पिंपरी: बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर येथे पैसे वाटण्यावरून आमदार रोहित पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भातील व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर ट्विट केले होते. या आरोपांना आता आमदार सुनील शेळके यांनी उत्तर दिले आहे. रोहित पवार हे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे म्हणतात. पण जेव्हा अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या खंडोबा देवाच्या पायथ्याशी मटणाच्या दोन हजार टन गाड्या खाली केल्या, मटण, दारू, मतदारांना दोन हजार वाटले. त्यामुळे तुम्ही आम्हाला राजकारण शिकवू नका, अशा शब्दात सुनील शेळके यांनी रोहित पवार यांना उत्तर दिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे मातदान आज पार पडत आहे. त्यात अनेक घडामोडी घडताना आपल्याला पहायला मिळत आहे. त्यात भोरच्या घटनेने संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. त्यात रोहित पवारांनी अजितदादांच्या आमदारांवर आरोप केले आहे. त्यावर माध्यमांशी सुनील शेळके यांनी संवाद साधताना आपले स्पष्टीकरण दिले आहे.यावेळी शेळके म्हणाले की, मला बारामतीच्या युवराज यांना एवढंच सांगायचं आहे की, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने पार पडली पाहिजे. त्यांनी नोकरी आणि व्यवसायातील बांधवांना देखील प्रचारात उतरवलं तरीही आम्ही आक्षेप घेतला नाही. भोर, वेल्हा येथे गाडीत पैसे टाकून अर्धवट व्हिडिओ बनवले. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपला पराभव त्यांना दिसू लागला आहे. भोरच्या स्थानिक गुंडांना हाताशी धरून आमच्या भोरचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना घरात घुसून मारहाण केली. याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. यामुळे या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाने संपूर्ण सत्यता तपासावी, अशी मागणी सुनील शेळके यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

तसेच येणाऱ्या काही दिवसात निकाल तुमच्या समोर आल्यानंतर सत्य काय आहे ते तुम्हाला दिसेल, असे देखील शेळके यांनी सांगितले आहे. रोहित पवार नौटंकी करून राजकारण करू नका. त्यांनी स्वतः च कर्तृत्व दाखवून मोठं व्हावं. अजित पवारांना व्हिलन करून रोहित पवार मोठे होणार नाहीत. त्यामुळे येणाऱ्या बारामतीच्या निकालानंतर बराच काही स्पष्ट होणार, असल्याचे शेळके यांनी सांगितले.