अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांना गावातच किंमतच नाही, सुप्रिया सुळेंना भक्कम आघाडी

दीपक पडकर, दौंड (पुणे) : नुकत्याच पार पडलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवार सुनेत्रा पवार यांचे काम करूनही दौंड तालुक्यात सुप्रिया सुळे यांना अनपेक्षित मताधिक्य मिळाले. अर्थात जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याचे दिसून आले. कारण सुप्रिया सुळे यांना तब्बल २६ हजार ३३७ मतांची मोठी आघाडी मिळाली. यावेळी देखील २०१९ ची पुनरावृत्ती झाली.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात होते आणि त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबरोबर दौंड तालुक्यातील आत्ताचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे दोघेही होते. त्यामुळे तालुका एकीकडे होता. आता आहे तशीच परिस्थिती त्यावेळीही होती. मात्र प्रत्यक्षात मतदानात जनतेने वेगळाच कौल दिला. अनपेक्षित रित्या महादेव जानकर यांना तब्बल २५ हजारांची आघाडी मिळाली होती. सन २०१९ च्या निवडणुकीत देखील याचीच पुनरावृत्ती झाली. आताही राहुल कुल आणि आमदार थोरात एका बाजूला असताना जनतेने सुप्रियांना खंबीर साथ देऊन तब्बल २६ हजारांचे मताधिक्य दिले.
Baramati News : अजित पवार सोबत नसताना खडकवासला वगळता प्रत्येकमतदारसंघात लीड, शरद पवारांची जादू, सुप्रियाताईंचा चौकार

दौंडच्या जनतेने विधानसभेला उभे राहू इच्छिणाऱ्या नेत्यांना मात्र चांगलाच संदेश दिला आहे. संदेश म्हणण्यापेक्षा दणका दिला आहे. कारण जर आमदारकीला उभे राहू इच्छिणाऱ्या नेत्यांच्या गावातच नेत्यांना किंमत नसेल तर…?
Baramati Lok Sabha Election Results 2024: सुप्रिया सुळे लाखाच्या फरकाने विजयी, सुनेत्रा पवार यांना धक्का

माजी आमदार रमेश थोरात यांचा विचार केला तर त्यांच्या खुटबाव गावामध्ये सुनेत्रा पवार यांना १०२१ मते मिळाली तर सुप्रिया सुळे यांना ११६० मते मिळाली. थोडक्यात सुप्रिया सुळे यांना थोरात यांच्या गावातून १३९ मतांनी आघाडी मिळाली. आमदार राहुल कुल यांच्या गावामध्ये सुनेत्रा पवार यांना २०८४ मते मिळाली तर सुप्रिया सुळे यांना १३०२ मते मिळाले आहेत. या गावात सुप्रिया सुळेंपेक्षा सुनेत्रा पवारांना फक्त ७८२ मते जास्त मिळाली.. म्हणजेच सुप्रिया सुळे यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळाले.
Sharad Pawar: पवार है तो मुमकिन है! पक्ष गेला, चिन्ह गेलं तर काय? हाती काही नसताना शरद पवारांनी बारामती जिंकली

आता थोडं पूर्वीकडे पाहू… दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. अजित पवारांच्या पक्षाकडून आमदारकीसाठी ते भविष्यात इच्छुक आहेत. त्यांच्या गावात म्हणजे लिंगाळी गावात सुनेत्रा पवार यांना १०२७ मते मिळाली तर सुप्रिया सुळे यांना १०८१ मते मिळाली. या गावात सुप्रिया सुळेंना ५४ मते जास्त मिळाले आहेत. साखर कारखान्याची ताकद देखील या ठिकाणी वीरधवल जगदाळे यांचे मताधिक्य वाढवू शकले नाही.

पुढे आपण पाहिले तर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या खामगाव गावामध्ये सुप्रिया सुळे २२० मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांच्या पारगावात सुप्रिया सुळे यांना १७३ मते अधिक मिळाली. प्रेमसुख कटारिया हे राहुल कुल यांचे समर्थक आहेत. मात्र त्यांचे वर्चस्व असलेल्या दौंड शहरात सुद्धा सुप्रिया सुळे यांना अधिकची मते मिळाली आहे. एकंदरीतच दौंड तालुक्यामध्ये आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.