अखेर शिंदेंचे उमेदवार ठरले पण फडणवीसांनी डाव साधलाच, विद्यमान खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

भरत मोहळकर, मुंबई : राज्यात पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही महायुतीच्या ५ जागांवर तिढा कायम असल्याने उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या ५ जागांवर उमेदवार कधी जाहीर केले जाणार? असा सवाल उपस्थित केला जात असतानाच या जागांवर येत्या २४ तासात उमेदवार जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एका बाजूला महाविकास आघाडीने ४७ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या ५ जागांवर अजूनही प्रतीक्षा सुरू आहे. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याची माहिती समोर आली आहे.
असली शिवसेनेला ‘असली’ वागणूक? भाजपचं तेच तेच, शिंदेंपुढे वाढता पेच; कुठे कुठे होतेय दमछाक?

भाजपने आतापर्यंत २७, शिवसेना शिंदे गटाने १० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४ तर राष्ट्रीय समाज पक्ष १ उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र अजूनही ६ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत. या जागांवर येत्या २४ तासात उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील तीन जागांसह १६ सीट्स लढवणार; शिंदेंचा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबईवर अप्रत्यक्ष दावा

कुणाला उमेदवारी मिळेल?

उत्तर पश्चिम मुंबई येथून रवींद्र वायकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून आजच ही उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर उद्या ३० एप्रिल रोजी रवींद्र वायकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीतील धुसफुशीचा पुढचा अंक, मुंबईत भाजप उमेदवाराने अर्ज भरला, शिवसेना-राष्ट्रवादी गैरहजर

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यशवंत जाधव यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच ठाणे येथून रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक किंवा नरेश म्हस्के यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर नाही मात्र हेमंत गोडसेंनी उमेदवारी अर्ज घेतला

शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात चर्चा

तर कल्याणमधील श्रीकांत शिंदे यांचे अधिकृतरित्या नाव जाहीर करण्यात येणार आहे. तसेच पालघरमध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.