अखेरची चिठ्ठी लिहून पुण्याची रीलस्टार घराबाहेर पडली, १३ लाख फॉलोअर्सना धाकधूक, शेवटी…

पुणे : सोशल मीडियावर आपल्या अनोख्या रील व्हिडिओंमुळे चर्चेत असलेली इन्फ्लुएन्सर ‘माऊ’ घरातून कोणालाही काहीच न सांगता निघून गेली होती. घरात तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्यामुळे कुटुंबीयांसह तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही धाकधूक होत होती. अखेर तीन दिवसांनी तिचं लोकेशन ट्रेस झालं आहे. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर इन्स्टाग्राम रील स्टार “माऊ” अखेर सापडली. १५ जून रोजी घरातून कोणालाच काहीही न सांगता ती निघून गेली होती. त्यासोबत घरात तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. काल अखेर कोथरूड येथे तिचं लोकेशन ट्रेस झालं आणि ती सापडली.

कोण आहे माऊ?

मयुरी चैतन्य मोडक-पवार उर्फ माऊ ही पुण्यातली एक प्रसिद्ध रील स्टार आहे. तिला माऊ या नावाने ओळखलं जातं. इन्स्टाग्रामवर तिचे 1.3 मिलिअन म्हणजेच जवळपास 13 लाखांहूनही अधिक फॉलोअर्स आहेत.

तिने ‘दुर्गा ग्रुप’ नावाने एक संस्था स्थापन केली आहे. याद्वारे ती कपड्यांचा व्यवसाय करते. मयुरी ही १५ जून रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाच काहीही न सांगता निघून गेली होती. यावेळी तिने घरात एक सुसाईड नोट ठेवल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे घरात मोठी खळबळ माजली होती.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

सुसाईड नोट लिहून निघाली

घरच्यांनी तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली आणि अखेर ती कोथरूड येथे सायंकाळी सापडली.
Finger in Ice Cream : इंदापूरच्या फॅक्टरीत कर्मचाऱ्याचा अपघात, आईस्क्रिममध्ये सापडलेल्या मानवी बोटाचं गूढ उकललं
मयुरी १५ जून रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घरामधून निघून गेली होती. तिने या संदर्भामध्ये कोणालाही काहीही सांगितलेलं नव्हतं. याप्रकरणी मंगल दिलीप पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मयुरी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे तपास करीत होते. पोलीस मयुरीचा शोध घेत होते. त्यांना यश आलंय.