अंबादान दानवे विधानपरिषदेतून निलंबित, शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदुत्वाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर एकच गदारोळ झाला होता. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद पाहायला मिळाले. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला होता. आता शिवीगाळ प्रकरणानंतर अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विरोध पक्षनेत्यांचं पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबन करण्यात आलं आहे.
Anil Parab : मुंबईत उद्धव ठाकरेंकडून भाजपला धक्का; मुंबई पदवीधर मतदार संघातून अनिल परब दुसऱ्यांदा विजयी
दरम्यान, राहुल गांधी यांच्या हिंदुत्वाच्या वक्तव्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत ठराव मांडला आणि तो लोकसभेत पाठवण्याची मागणीही केली. तसंच विरोधी पक्षनेत्यांनी यावर उत्तर द्यावं असंही ते म्हणाले होते. त्यानंतर प्रसाद लाड यांनी अंबादास दानवेंवर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला.
Devendra Fadnavis : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत उमेदवारी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एकमेकांसमोर भिडले होते. प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे बोट दाखवल्यानंतर अंबादास दानवे यांनी माझ्याकडे बोट दाखवल्यास मला तो तोडण्याचा अधिकार असल्याचं म्हणत ते आक्रमक झाले होते. त्याचवेळी त्यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती.