३ सिलिंडर फ्री, योजनांना वाढीव निधी, २५ लाख लखपती दिदी; अजितदादांकडून ताईंसाठी मोठ्या घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुती सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात महिला, शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. महिला मतदारांचा विचार करुन अजितदादांनी अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.

मध्य प्रदेशात भाजपला दणदणीत विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरलेली लाडली बेहना योजना राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येईल. या योजनेसाठी दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील.
माझ्या केबिनमध्ये या! फडणवीसांच्या खाणाखुणा अन् वडेट्टीवार, पटोलेंनी दालन गाठलं, काय घडलं?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली. या योजनेनुसार पात्र महिलांना वर्षाकाठी ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येतील. याचा फायदा ५२ लाख कुटुबांना होईल. बचत गटाच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. आधी १५ हजार रुपये निधी दिला जायचा. आता तो ३० हजार रुपये करण्यात आला आहे. सरकारी रुग्णालयात स्तन, गर्भाशय चाचण्या मोफत होतील.
दादा, भाऊंना पाडण्याची तयारी, मविआच्या गोटात जोरदार हालचाली; दोन्ही उपमुख्यमंत्री रडारवर
विवाहित मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. हा निधी १० हजारांवरुन २५ हजारांवर नेण्यात आला आहे. यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्यााचा संकल्प महायुती सरकारनं केला आहे. राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांना देण्यात येतील. व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे.