हिऱ्यांऐवजी कचऱ्याचं काम करा, नितीन गडकरींचा सल्ला, कारण काय?

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि विचारांसाठी ओळखले जातात. तसेच गडकरी वेळोवेळी आपल्या सुपीक डोक्यातून नवनवीन कल्पना लोकांसमोर मांडत असतात. अशीच नवी कल्पना त्यांनी पुन्हा एकदा मांडली आहे. ज्यामध्ये त्यांनी हिऱ्यांचे काम करण्याऐवजी कचऱ्याचे काम करा, असे सुचवले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गडकरी मुंबईत पोहोचले होते. जेथे भाजपच्या विशेष संपर्क अभियानांतर्गत त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, ‘महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना एका दुकानात टेलिव्हिजन घेण्यासाठी गेलो होतो. मी दुकानदाराला सांगितले की, त्यांना हप्त्यांमध्ये टीव्ही हवा आहे. दुकानदाराला आपण मंत्री असल्याचे समजल्यावर ते म्हणाले. की चांगला पीस नाही आहे, जेव्हा चांगला पीस येईल तेव्हा मी लावून देईल, पण तो दिवस कधीच आला नाही.’
Nagpur Weather Updates : हा उन्हाळा की पावसाळा? बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
या टिव्हीच्या विषयावरुन गडकरींनी अर्थशास्त्राची नीति सांगितली. ते म्हणाले, ‘दुकानदाराने विचार केला की मंत्र्याला हप्ता दिल्यानंतर पैसे येतील की नाही, टीव्ही आला नाही. पण माझ्या मनात एक विचार आला की टीव्ही, फ्लॅट आणि फ्रीज हप्त्यावर विकत घेता येतील. तर मग रस्ता, पूल.” बोगदा का मिळत नाही? मग त्यावर धोरण ठरले, जे उदारमतवादी धोरण आहे. भाजप सरकारने हे उदारमतवादी अर्थशास्त्र स्वीकारले आहे.’
Jungle Safari: पर्यटकांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात प्रथमच बोट सफारी सुरू, बोटीत बसून अनुभवा वन्यजीवन
दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेही म्हणाले की, “मथुरेत एक प्रकल्प यशस्वी झाला आहे. मथुरेच्या घाण पाण्याचा पुनर्वापर करून त्याचा वापर केला जात आहे. लिक्विड बेस मॅनेजमेंट आधारित व्यवस्थापनात हा प्रकल्प यशस्वी ठरला. ते लोकांना हिऱ्याऐवजी कचऱ्याचं काम करायला सांगतात, ही काही हसण्याची बाब नाही. हिरा काही नाही, कचरा खूप महत्वाचा आहे, कचऱ्यावर प्रक्रिया करा. हे जर तुम्ही केलं तर त्यात प्लॅस्टिक, काच, ॲल्युमिनियम असेल त्याची पुनर्प्रक्रिया होईल, आणि त्या कचऱ्यापासून हायड्रोजन तयार होईल आणि सर्व वाहने त्याने चालतील, या कल्पक बाबीने गडकरींनी व्यापाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.