नमित पाटील, वसई : शेतात कामासाठी गेलेले १६ नागरिक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीपलीकडे अडकून पडल्याची घटना वसईत घडली. तानसा नदीची पाणी पातळी वाढल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि नदीपलीकडे १६ जण अडकून पडल्याची घटना वसई तालुक्यात घडली आहे. एनडीआरएफचे पथक आणि अग्निशामन दलाने नदीपलीकडे अडकलेल्या १६ नागरिकांची बचाव कार्य करत सुखरूप सुटका केली आहे. नागरिकांची सुखरूप सुटका झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील सायवन चाळीसपाडा येथील आठ महिला आणि आठ पुरुष असे १६ नागरिक रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास तानसा नदी ओलांडून, नदी शेजारी असलेल्या एका शेतात शेती काम करण्यासाठी गेले होते. पालघर जिल्ह्याच्या काही भागात आणि तानसा धरण परिसरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रभरात अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तानसा धरण परिसरात, तसंच तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने तानसा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आणि पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सकाळी नदी पलीकडे शेतात काम करण्यासाठी गेलेले १६ नागरिक पाणी पातळी वाढल्याने शेतातच अडकले. त्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली. घटनेची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर महसूल विभागामार्फत एनडीआरएफचे पथक, अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली आणि बचाव कार्य करण्यासाठी पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक दीड वाजताच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ पथकाकडे असलेल्या रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बचाव कार्य राबवत नदीच्या पलीकडे शेतात अडकलेल्या १६ नागरिकांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास हे बचावकार्य पूर्ण करण्यात आले. पुरात अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप सुटका केल्यानंतर या नागरिकांनी एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे आभार मानले.