दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्या जागांवर निवडणूक लढवने योग्य ठरेल या विषयी चर्चा झाली. त्यानुसार, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यामते, आठ पैकी सहा जगा लढण्यास पुण्यात योग्य राहील. त्या म्हणजे, कोथरूड, पर्वती, कसबा, पुणे छावणी (कॅन्टोन्मेंट), वडगावशेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचे एकमेव काँग्रेसचे आमदार राहिलेली जागा देखील मागितली आहे. त्यामुळे येथे रस्सी खेच होण्याची शक्यता सर्वधिक आहे.
राष्ट्रवादीच्या पुण्यातील या सहा मतदारसंघांवर दावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हडपसर, पर्वती, वडगावशेरी, खडवासला, छावणी, शिवाजीनगर अशा ६ मतदारसंघावर दावा केला आहे. पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा एकही आमदार पुण्यात नाही. तरी सुद्धा सहा जागा आपण जिंकू असा विश्वास प्रशांत जगताप यांना आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली, यामध्ये या सहा विधानसभा जागांबाबत दावा करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीमधील पुण्यासंदर्भात सहा-सहा जागेची मागणी करण्यात आली आहे. परंतू, अजून काँग्रेस पक्षाने एक शब्द ही काढलेला नाही. तरी अजून किमान समान जागा वाटपा संदर्भातचा कार्यक्रम पार पडायचा आहे. त्यामुळे कोण्याच्या वाटायला किती जागा मिळतील हे पाहावं लागेल.