पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित बहुजन आघाडी’चे उमेदवार वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाने ‘रोडरोलर’ हे चिन्ह दिले आहे. त्यानंतर मोरे यांनी आपले निवडणूक चिन्ह समाजमाध्यमात शेअर केले असून, ‘विकासाचा रोडरोलर प्रस्थापितांची झोप उडविणार,’ असे आव्हान प्रतिस्पर्धी उमेदवारांना दिले आहे.
‘राज्यात १२ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात थेट लढत होत असून, तिथे वंचितचा फायदा होणार आहे. तेथील धर्मनिरपेक्ष मतदार वंचितकडे वळतील’, असा दावा त्यांनी केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘बाबासाहेब आंबेडकर आले, तरी राज्यघटना बदलू शकत नाहीत, असा खोटा दावा मोदी करीत आहेत. पंतप्रधान असल्याने त्यांना कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशावरील कर्ज वाढले आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास लोकशाही व राज्यघटना संपेल, गल्लीबोळात मणिपूरसारखी स्थिती दिसेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर म्हणत आहेत. निवडणूक रोखे खरेदीसाठी अनेकांवर दबाव टाकल्याने ते विदेशात जाऊन बसले आहेत. या सरकारच्या विरोधात लोकांच्या मनातील राग मतदानातून व्यक्त होईल’, असेही ते म्हणाले.