वळसे म्हणाले व्हिलचेअरवर बसून प्रचाराला येतो, अजितदादा म्हणतात… दिलीपराव, तुम्ही शांत रहा

मंचर :‘सत्ता असल्याशिवाय बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाचा विकास होत नाही, असे यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे. विरोधात असताना आंदोलन करू शकतो, मोर्चे काढू शकतो, भरीसभर उपोषणही करू शकतो, भांडू शकतो आणि विरोधही करू शकतो. मात्र, सामान्य माणसाचा विकास करण्यासाठी सत्ता आवश्यक आहे. त्यासाठीच मी सत्तेत सहभागी झालो आहे,’ या भूमिकेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुनरुच्चार केला. ‘पवार साहेब म्हणाले म्हणून सन २०१९ला मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार यांची टाकळी हाजी आणि लोणी येथेही सभा झाली. घोडेगाव येथील सभेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, घोडेगावच्या सरपंच ज्योती घोडेकर, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदी उपस्थित होते.

‘शिरूरचे विद्यमान खासदार निवडून आल्यानंतर वर्षभरात राजीनामा द्यायला निघाले होते. पैशासाठी प्रसंगी नथुराम गोडसेची भूमिका करायला मागेपुढे न पाहणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची वृत्ती चांगली नाही. विकासाशी काही घेणेदेणे नसलेल्या या अभिनेत्याला त्याची जागा दाखवा,’ या शब्दांत पवार यांनी कोल्हे यांना लक्ष्य केले. ‘शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहुमताने निवडून द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.

‘दिलीपराव, तुम्ही शांत राहा’

‘तुम्ही आमच्या तालुक्यात आला आहात. शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारसभेत मी व्हीलचेअरवर बसून सहभागी होतो,’ असे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला सांगितले. मी त्यांना म्हणालो तुम्ही येऊनही घड्याळाचाच प्रचार करणार आहात. आम्हीही घड्याळाचाच प्रचार करणार आहोत. त्यापेक्षा तुम्ही शांत राहा आणि तब्येतीची काळजी घ्या,’ असे अजित पवार यांनी सांगितले.
पद गेल्यावर कोण विचारत नाही, अजितदादांनी आबांचा किस्सा सांगितला, एकही जण भेटायला आला नाही…

अजितदादांचा पारा चढतो तेव्हा…

मंचर येथील सभेत भाषणासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचे नाव पुकारताच अजित पवार यांचा पारा चढला. ‘हे तुमचे काय सुरू आहे? मला दिवसभर सभा घ्यायच्या आहेत. मी सभेला जातो तिथे उमेदवार आणि मी बोलतो. इथे याला बोलू दे, त्याला बोलू दे सुरू आहे. मी भाषणे ऐकायला आलो की भाषण करायला आलो, हेच मला कळत नाही,’ अशा शब्दांत पवार यांनी फटकारले.
मराठी-गुजराती वाद जाणीवपूर्वक, धार्मिक विषमतेने सलोखा बिघडवण्याचे काम, वर्षा गायकवाडांचा दावाRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

मी बारामती येथे आईला मतदानासाठी घेऊन गेलो, यावरून राजकारण चालू आहे. माझ्या आईला मतदानासाठी मीच नेणार ना… आईला मतदानासाठी नेऊन दादांनी राजकारण केले, असा प्रचार करून नौटंकी सुरू आहे. घरातील ज्येष्ठांना हाताला धरून मतदानाला तुम्ही नेत नाही का?
– अजित पवार, उपमुख्यमंत्री