संदीप देशपांडे vs आदित्य ठाकरे?
जर मनसेने विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले तर वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे वर्सेस मनसेचे संदीप देशपांडे हा थेट सामना रंगू शकतो. जर पक्षाने संधी दिली, तर मी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्यास सज्ज आहे, असं पण ते अनौपचारिक चर्चेत सांगतात.
शिंदे गटाला वरळीत लीड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रातून महायुतीच्या यामिनी जाधव यांना लक्षणीय मते मिळाली होती. मराठी मतदार प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात मनसेची पण मोठी मतदार संख्या आहे. संदीप देशपांडे यांनी एकदा येथून विधानसभा निवडणूकही लढवलेली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
आदित्य ठाकरेंसाठी वरळी असुरक्षित?
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांना इतर विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून कमी मतं मिळालेली होती. तेव्हापासूनच आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदारसंघ सुरक्षित नसल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच शिवडी विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे नशीब आजमावू शकतात, अशी पण शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे.
अमित ठाकरेंच्या गाठीभेटी वाढल्या
दरम्यान, संदीप देशपांडे वरळी विधानसभेची तयारी करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात हालचाली वाढताना पाहायला मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी वरळीत बैठका आणि गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.