विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले. या वेळापत्रकानुसार १५ मे २०२४ रोजी नोटीफिकेशन जारी केले जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख २२ मे असेल. अर्ज मागे घेण्याची मुदत २७ मे असणार आहे.
या चारही जागांसाठीचे मतदान १० जून २०२४ रोजी होणार आहे. मदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे. मतमोजणी १३ जून रोजी होईल. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया १८ जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
विधान परिषदेतील या सदस्यांची मदत संपत आहे
मुंबई पदवीधर मतदासंघाचे विद्यमान आमदार विलास पोतनीस, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखेर, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार कपिल पाटील हे चारही सदस्य ७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत.