मुंबई: सत्ताधाऱ्यांना देशात ४०० जागा मिळणार असल्याचं गृहित धरुन महायुतीचा मतदार लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी साजरी करण्यासाठी गेला आणि म्हणून महायुतीला राज्यात कमी जागा मिळाल्या, अशी मांडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. विरोधकांच्या नरेटिव्हला प्रयुत्तर देण्यात महायुतीचे नेते कमी पडल्याची कबुली शिंदेंनी दिली. महायुतीमधील पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शिंदे यांनी लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीनं ३० जागांवर बाजी मारली. ‘लोकसभेवेळी अब की बार ४०० पारचा नारा देण्यात आला होता. त्यामुळे आमचे मतदार यंदा ४०० पार होणारच आहे असं धरुन चालले. बरेचसे मतदार मतदानाच्या दिवशी सुट्टीवर गेले. त्याचा फटका बसला आणि लोकसभेत कमी जागा आल्या. आपल्याला व्यूहनितीत बदल करण्याची गरज असल्याचं या पराभवातून स्पष्ट झालं आहे,’ असं शिंदे म्हणाले. लोकसभेसाठी ४०० पारची घोषणा पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून देण्यात आली होती. त्यामुळे शिंदेंनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच लोकसभेतील खराब कामगिरीसाठी जबाबदार धरलंय की काय, अशी चर्चा आहे.
विरोधकांनी मतदानाच्या दिवशी त्यांच्या मतदारांना घराबाहेर काढून अधिक मतदान घडवून आणलं. विरोधकांच्या ८० टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. आपले ६० टक्के मतदार जरी पोलिंग बूथवर गेले असते, तर ४० जागा सहज जिंकता आल्या असत्या, असं गणित मुख्यमंत्र्यांनी मांडलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेसला भ्रष्टाचाराचा इतिहास आहे. बोफोर्स, चारा, कोळसा असे अनेक घोटाळे काँग्रेस सरकारच्या काळात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घोटाळ्याचा आरोप आहे का, असा सवाल शिंदेंनी विचारला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेते, पदाधिकारी, प्रवक्त्यांना संबोधित करताना नरेटिव्हचा विषय पुन्हा उपस्थित केला. ‘महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एनडीएच्या उमेदवारांपेक्षा केवळ २ लाख अधिक मतं मिळाली आहेत. पण त्यांनी ३० जागा जिंकल्या आहेत. ते माध्यमांसमोर दररोज खोटं बोलत होते. याचा परिणाम आपल्या मतदारांवर होणार नाही अशी आपली ठाम समजूत होती. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. त्याचा परिणाम आपल्या मतदारांवर झाला. आपण प्रतिवाद करण्यात कमी पडलो,’ असं फडणवीस म्हणाले.