मुंबई: मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूनं बिनशर्त उभा राहतो आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा ही समाजाची भावना आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा पाठिंबा बिनशर्त आहे की नाही हे महाराष्ट्राला माहीत आहे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राज यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरे ‘फिर एक बार’ करतील असं म्हणत त्यांनी मनसेप्रमुख पुन्हा भूमिका बदलतील, असं ठामपणे सांगितलं. मटा ऑनलाईनच्या ‘पत्रकार परिषदे’मध्ये ते बोलत होते.
संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीचा लढा सुरु आहे. संविधानाचं रक्षण हीच उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव यांची भूमिका आहे. त्यामुळे मुस्लिम समाज आज मोठ्या प्रमाणात ठाकरेंना पाठिंबा देत आहेत. आमचा पाठिंबा बिनशर्त आहे. समाज म्हणून जनमानसाची भूमिका आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. संविधानचं आमचं रक्षण करणार ही आमची भावना आहे. त्यामुळे संविधानासाठी लढणाऱ्यांच्या बाजूनं आम्ही उभे आहोत, असं रईस शेख म्हणाले.
महाविकास आघाडीची लढाई संविधानाच्या रक्षणासाठी असल्यानं मुस्लिम समाज त्यांच्या पाठिशी बिनशर्त उभा आहे. महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंचा बिनशर्त आहे की नाही ते महाराष्ट्र जाणतो, असा टोला शेख यांनी लगावला. राजसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी भाजपचा अजेंडा चालवू नये असं मला वाटतं. महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर प्रेम करते. संदिप देशपांडे यांच्यासोबत मी काम केलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी भाषा हा मनसेचा ओरिजनल अजेंडा आहे. तोच अतिशय शक्तिशाली आहे. त्यामुळे राज यांना खरंतर भाजपची गरज नाही, असं शेख यांनी म्हटलं.
‘भाजपचे नेते काय करतात. आपल्या नेत्यांना म्हणजे मी राज साहेबांना आपला नेता म्हणतो. भाजपवाले आपल्या नेत्यांना अजेंडा देऊन फिरवतात. राज साहेब मोठे नेते आहेत. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा मुद्दा घ्यावा. धार्मिक मुद्दा त्यांचा नाही आणि मला तर वाटतं त्यांनाही हे सगळं पटत नाही. ते बोलतात, भाषणं करतात. पण मला तर वाटतंय त्यांनाही ते जे काही बोलतता ते पटत नाही. आता ते हे सगळं बिनशर्त करताहेत. पण मला असं ठामपणे वाटतं की ते फिर बार व्हिडीओ लावतील. कारण ते फॅक्ट्स मांडतात. त्यांच्याकडून होत असलेल्या चुका ते लवकरच सुधारतील, असं म्हणत रईस शेख यांनी राज पुन्हा एकदा भाजपविरोधी भूमिका घेतील असा विश्वास व्यक्त केला.

राज ठाकरेंच्या सतत बदलत जाणाऱ्या भूमिका, त्यामुळे कार्यकर्ते, जनतेत निर्माण होणारा संभ्रम यावरही शेख यांनी भाष्य केलं. ‘मी कॉलेजात असताना माझे प्रोफेसर सांगायचे. संभ्रम असणं, द्विधा मनस्थिती हे काही चुकीचं नाही. अशी मनस्थिती माणसाचं प्रतिबिंब असते. भूमिका बदलणं काही गैर नाही. राज साहेब माणूस म्हणून खूप चांगले आहेत. त्यामुळे फिर एक बार होईलच असा ठाम विश्वास मला वाटतो,’ असं शेख म्हणाले.