मोदी-शहांमुळे शेअर बाजार घोटाळा, राहुल गांधींची चौकशीची मागणी, पवारांचाही पाठिंबा

प्रतिनिधी, मुंबई : सदोष एक्झिट पोलमुळे शेअर बाजारातील उसळीचा तसेच नुकसानीची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून (जेपीसी) चौकशी व्हावी या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेची पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एक्झिट पोल, त्यानंतर शेअर बाजारात आलेली तेजी आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यात झालेल्या पडझडीत सामान्य गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी याविषयी जेपीसीची मागणी केली आहे.
Congress, BJP on Stock Market: शेअर बाजार घसरताच राजकीय वातावरण तापले, काँग्रेसच्या आरोपावर भाजपचा पलटवार

शुक्रवारी जयंत पाटील यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून त्यांनी लिहिले की, चुकीच्या एक्झिट पोलमुळे जर भांडवली बाजारात इतकी अनियमितता होऊ शकते तर त्याची चौकशी होण्याची गरज आहे. भारतातील जनतेला यामागचे सत्य जाण्याचा हक्क आहे, एक्झिट पोल इतके कसे काय चुकले आणि माध्यमांच्या यातील भूमिकेची पारदर्शकपणे चौकशी व्हावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
PM Modi Commented On Stock Market: निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पहिला बॉम्ब टाकला; तिसरी टर्म सुरू होण्याआधी मोदी-शहांवर गंभीर आरोप

मोदी-शहांमुळे शेअर बाजार घोटाळा, राहुल गांधी यांचा आरोप

‘लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेअर बाजाराबाबत धडधडीत केलेल्या टिप्पणीमुळे निकाल लागल्यावर सामान्य गुंतवणूकदारांचे किमान ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. मोदी यांनी शेअर बाजारात विक्रमी वाढ झाल्याचे सांगत लोकांना शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. भारतातील हा सर्वांत मोठा शेअर बाजार घोटाळा असून त्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) व्हावी’, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.

ज्यांचे पैसे बुडाले आहेत, त्यात काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणमधील लोकांचाही समावेश आहे. या तीन राज्यांत तुमचीच सरकारे आहेत, यावर राहुल गांधी यांनी, अशा गोष्टींसाठी ‘जेपीसी’ हे योग्य साधन असेल, असे मत मांडले.