पिंपरी: काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसोबत यावं, अशी थेट ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारमधील सभेतून दिली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी ऑफर फेटाळून लावली. मोदींच्या ऑफरवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं आहे.
मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी रोड शो केला. पिंपरी-चिंचवड शहरातील रोड शोमध्ये मुख्यमंत्री तास सहभागी झाले होते. त्यात खासदार बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे यांचा सहभाग होता. यावेळी त्यांना पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना दिलेल्या ऑफरबद्दल विचारण्यात आलं.
देशासाठी काही करायचं असेल तर उद्धव ठाकरे, शरद पवारांनी खऱ्या शिवसेनेसोबत आणि खऱ्या राष्ट्रवादीसोबत यावं, अशी ऑफर मोदींनी नंदुरबारमध्ये १० मे रोजी घेतलेल्या सभेत दिली. त्यावर शिंदेंनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीत खुपसला आहे. त्यामुळे भाजप त्यांना सोबत घेणार नाही, असं शिंदे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही, असं भाकित शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं. ‘महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या किमान ३५ जागा जिंकत आहे. पंतप्रधान मोदी राज्यात ठाण मांडून बसलेत. पण त्यानं काही होणार नाही. शिंदेंनी पक्ष चोरला. धनुष्यबाण चोरला. त्यांच्याकडे स्वत:चं असं आहेच काय? त्यांना लोक मतं देणार नाहीत. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांच्याकडे आता उरलंय काय?’, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.