पुणे (लोणावळा) : मुंबई – पुणे एक्सप्रेसवर आज सकाळी सातच्या सुमारास किलोमीटर ३९ जवळ असणाऱ्या नवीन बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून आहे. अन्य जखमी झाले आहेत. तीन वाहने एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. अक्षय व्यंकटेश ढेले (वय ३०) असं अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तो गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर कार घेऊन जाणारा कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत मृताला खोपोली येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – पुणे एक्सप्रेस महामार्गावरील नवीन बोगद्याजवळ तीन वाहने एकमेकांना धडकली. त्यामध्ये कंटेनर वाहन क्रमांक एमएच ४३ सीई ३२१७, गॅस टँकर क्रमांक एमएच ०४ एचडी ९१९८, तर कार कंटेनर क्रमांक एनएल ०१ एडी ३१४६ ही वाहने एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये गॅस टँकरमधील चालक गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. अपघातात कारणीभूत असलेला कंटेनर चालक पळून गेला आहे. घटनेनंतर वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत तत्परता दाखवत सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. बोगद्याच्या बाहेर वाहतूक थांबवण्यात आली होती.

दरम्यान, वडील आंधळे, आईला चालता येत नाही… बहिणींची लग्न झालेली… घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अवघ्या दहा हजाराची नोकरी.. बुधवारी रात्री आसिफ शेख घरात कुटुंबासह जेवायला बसले. बाहेर प्रचंड पाऊस आणि संपूर्ण घर जमिनीत गाडलं गेलं. मोठा आवाज झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता दाखवली आणि ते घरातून बाहेर पडले, अन्यथा सर्वांना आपला जीव गमवावा लागला असता. अंगावर शहरे आणणारा थरारक अनुभव सांगताना ते थरथर कापत होते. ही घटना आहे वेल्हे तालुक्यात घडली आहे.