मुंबई: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यातच आता ग्रँट रोड परिसरातील एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रँट रोड येथील रुबिनिसा मंझिल या इमारतीचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली आहे.
ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत आहे. ही म्हाडाची इमारत आहे. याच इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला आहे.
या इमारतीसाठी म्हाडाने कुठल्याह प्रकारची नोटीस जारी केली नसल्याची माहिती आहे. याला लेव्हल I कॉल घोषित करण्यात आला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.