मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बरवर उद्या मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक

मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेने शनिवारी मध्यरात्रीनंतर मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे

स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : ११.०५ ते ३.५५

परिणाम : ब्लॉकवेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

स्थानक : सीएसएमटी ते वांद्रे/चुनाभट्टी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

परिणाम : सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल ते कुर्लादरम्यान फलाट क्रमांक-८वरून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक : मुंबई सेंट्रल ते माहीम
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५

परिणाम : ब्लॉकवेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिराच्या लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.