मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहारदरम्यान आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर, माहीम ते गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : सकाळी १०.५५ ते ३.२५

परिणाम : ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील अप-डाऊन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही फेऱ्या रद्द, तर काही २० ते २५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०


वेळ : सीएसएमटी-वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगावदरम्यान धावणाऱ्या फेऱ्या रद्द असणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना छडी; शिक्षण विभागाची करडी नजर, परवानगी न घेतल्यास थेट ‘कारणे दाखवा’
पश्चिम रेल्वे
स्थानक : माहीम ते गोरेगाव
मार्ग – अप आणि डाऊन (हार्बर)
वेळ – सकाळी ११ ते दुपारी ४

परिणाम – सीएसएमटी ते वांद्रे/पनवेल/गोरेगाव लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. चर्चगेट ते विरार डहाणू रोडदरम्यान ब्लॉक नसल्याने नियमित फेऱ्या धावणार आहेत.