माझी लहान बहीण, तिला लोकसभेत पाठवणार, उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; विजयानंतर वर्षा गायकवाड मातोश्रीवर

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : माझ्या विजयासाठी काँग्रेससह शिवसैनिकांनीही मोठे कष्ट घेतले आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी मी मातोश्रीवर आले आहे. उद्धव ठाकरेंचे काँग्रेसला दिलेले पहिले मत वाया गेले नाही, असे प्रतिपादन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या नवनियुक्त खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी केले.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहचल्या. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. या भेटीत वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख, युवराज मोहिते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Ashish Shelar : राजकारण सोडण्याच्या वक्तव्यावरुन आशिष शेलार यांचा युटर्न, म्हणाले – आधी उद्धव ठाकरे यांनी…
या आधी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्यानंतर वर्षा गायकवाड या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहचल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहचल्या.
Baramati News : अजित पवार सोबत नसताना खडकवासला वगळता प्रत्येकमतदारसंघात लीड, शरद पवारांची जादू, सुप्रियाताईंचा चौकार
या भेटीनंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “वर्षा गायकवाड ही माझी लहान बहीण आहे, तिला लोकसभेत पाठवणार”, हा शब्द दिला होता, तो त्यांनी खरा करून दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर महाराष्ट्रात मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मताने काम केले, त्यामुळेच आम्हांला घवघवीत यश मिळाले. आगामी विधानसभेची सुद्धा आम्ही चांगली तयारी करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. वर्षा गायकवाड यांची लढत महायुतीकडून भाजपतर्फे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी सर्वाधिक २७ उमेदवार रिंगणात असलेल्या मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळला आणि उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला.