पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा जागीच शेवट झाला. कार चालवणारा आरोपी अल्पवयीन असून तो बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा मुलगा आहे. अपघातापूर्वी तो पबमध्ये गेला होता. तिथे त्यानं मित्रांसोबत मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आता पोलीस या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करत आहेत.
सबळ पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी पोर्शे कारची फॉरेन्सिक तपासणी केली. अपघातग्रस्त पोर्शे टायकॅन कार तब्बल अडीच कोटी रुपयांची आहे. सध्या ती येरवडा पोलिसांच्या ताब्यात आहे. या कारची तपासणी करुन पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा केले. यामध्ये कारमधील जीपीएस आणि कारला लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात टिपण्यात आलेल्या फुटेजचा समावेश आहे.
‘अपघातग्रस्त कार सध्या येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे. फॉरेन्सिक पथकानं कारची तपासणी केली. अपघातस्थळाची फॉरेन्सिक तपासणी आधीच झालेली आहे. आता कारची तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे. जीपीएस, कारला लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची तपासणी झालेली आहे,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली.
अल्पवयीन आरोपी कोझी रेस्टॉरंट आणि ब्लॅक क्लबमध्ये गेला होता. तिथून परतत असताना त्यानं पोर्शे कार भरधाव वेगात दामटवली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून सध्या या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. आरोपीचं घर ते कोझी रेस्टॉरंट, ब्लॅक क्लब ते अपघातस्थळ या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं जात आहे.

अपघातावेळी अल्पवयीन मुलासोबत असलेले त्याचे मित्र आणि कारचा चालक यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. आरोपीच्या आजोबांचीदेखील चौकशी करण्यात आली. अपघातग्रस्त पोर्शे कारची नोंदणी रिऍल्टी फर्मच्या नावे आहे. आरोपीचे आजोबा या फर्मचे मालक आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली. अपघाताच्या रात्री नेमकं काय घडलं, त्यावेळचा घटनाक्रम काय होता याबद्दलचा