‘राज्यात अतिशय किळसवाणी पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणू पाहणाऱ्यांच्या आदुबाळ नाइट लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेल्या जाहिरातीत जे पात्र आहे तो ‘अॅडल्ट स्टार’ आहे. तोच महिलांवरील अत्याचार कधी थांबणार, अशी विचारणा करताना जाहिरातीत दिसत आहे. उल्लू अॅपवर तोच मुलींसोबत घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडिओ, क्लिप्स आहेत. उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कोणती संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत? संबंधित जाहिरात कंपनी आणि त्यांचा संबंध काय; तसेच पबसंस्कृतीशी त्यांचा काही संबंध आहे का, या प्रश्नांची उत्तरे ठाकरेंनी द्यावीत,’ अशी मागणी वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारने अनेक अश्लील अॅपवर बंदी आणली आहे. आता इतर अॅपवरही कारवाई करावी अशी केंद्राला विनंती आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना असे ‘अॅडल्ट स्टार’ सापडणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘सेक्स व्हिडिओबद्दल गुपचीळी का?’
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वाघ यांच्या आरोपांना उत्तर देणारी पोस्ट ‘एक्स’वरून केले आहे. ‘आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या; पण तीन हजारांहून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेले धर्मनिरपेक्षा जनता दलाचे प्रज्वल रेवण्णा, किंवा मुलुंडच्या एचडी व्हिडिओवाल्याबद्दल त्या अळीमिळी गुपचिळी करून बसल्या आहेत. वास्तविक त्यांची काही चूक नाही, सध्या त्या ‘दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरी’च्या आहेत,’ अशा शब्दांत अंधारे यांनी वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही वाघ यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.