भुजबळ पवारांच्या भेटीला, दरेकर म्हणतात, अंदाज लागत नाही, छगनरावांचं राजकारण नेहमीच सनसनाटी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी दाखल झाले. भुजबळांच्या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवारांनी प्रकृतीच्या कारणास्तव केवळ दोनच पूर्वनियोजित भेटी ठरवल्या होत्या. मात्र भुजबळ अचानक दाखल झाल्याने त्यांना तासभर वेटिंगवर ताटकळत बसावं लागलं. या भेटीविषयी बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यांनी आरक्षणासंदर्भात भूमिका जाणून घेण्यासाठी भुजबळ पवारांच्या भेटीला गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करतानाच भुजबळांचा अंदाज लागत नाही, असे ते बेधडक नेते असल्याची प्रतिक्रिया दिली.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण जातीपातीत विभागलं जात आहे. दोन समाजांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. अशा वेळी ती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु शरद पवार यांची नेहमीच भूमिका राहिली, की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. नेमके ते सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर शरद पवारांविषयी वेगवेगळी वक्तव्य येऊ लागली. नेमकी त्यांची भूमिका काय, मराठा किंवा ओबीसी समाजाचे आरक्षण असो किंवा सगेसोयरे असो… छगन भुजबळ यांचा रोखठोक स्वभाव आहे. काल त्यांनी बारामतीतही हा सवाल विचारला. या परिस्थितीत शरद पवारांनी भूमिका घ्यावी, अशी विनंती ते करणार असतील, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
MLC Election 2024: काँग्रेसमध्ये २ गट अन् नार्वेकरांसमोर संकट; ‘त्या’ यादीवर ठाकरेंना अविश्वास; बैठकीत काय घडलं?
महाराष्ट्रातील जनतेला आजही उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेस नेते आरक्षणाच्या विषयाकडे नुसते लांबून पाहतात, भूमिका नाही, असं वाटतं. आरक्षण टिकवण्यासाठी सगळे एकत्र राहणार आहोत का? यासारख्या काही अनुत्तरित प्रश्नांवर एकत्र बसून मार्ग निघावा, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. हे समजून घेण्यासाठी भुजबळ गेले असावेत, असं दरेकर टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

MLC Election 2024: ठाकरेंकडून मविआ सोडण्याचा इशारा; पवारांचे अनेक कॉल, पण नो रिस्पॉन्स; MLC निवडणुकीआधी घमासान

भुजबळांचा अंदाज लागत नाही

दरम्यान, छगन भुजबळ यांना लोकसभा किंवा राज्यसभा निवडणुकात संधी न मिळाल्याने ते पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा होत्या, या भेटींचा त्याच्याशी काही संबंध असेल का, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांना विचारला असता, छगन भुजबळांच्या अस्वस्थतेविषयी काही सांगता येत नाही, मात्र त्यांचं राजकारण नेहमीच सनसनाटी राहिलं आहे. ते अस्वस्थ असतात, पुन्हा जोरात बाहेर पडतात. अशावेळी त्यांचा अंदाज लागत नाही, बेधडक असा तो नेता आहे. त्यामुळे अस्वस्थ आहेत की ओबीसी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाणून घ्यायची आहे, हे ते परत आल्यावरच समजू शकेल, असं दरेकर म्हणाले.