“बारामतीत महायुतीची जागा निवडून यावी, अशी सर्वांची इच्छा होती, पण ही जागा जर मी अपक्ष लढलो असतो, तर एक हजार टक्के जिंकलो असतो. कारण दोन्ही उमेदवारांना मोठा विरोध होता. इथे पक्ष नाहीत, तर दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक पवार प्रो आणि दुसरा पवार विरोधी आहे. पाच लाख ८० हजार इतकं पवार विरोधी मतदान आहे. त्यांना दोन्ही उमेदवारांना मतदान करायचं नव्हतं. त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून लोकशाहीतील पवित्र काम मी करतोय, असं मी बोललेलो होतो. मी कोणाच्या विरोधात नव्हतो” असं विजय शिवतारे म्हणाले.
माजी मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांनी बंड पुकारत बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना भगिनी सुप्रिया सुळेंविरोधात रिंगणात उतरवल्याने बारामतीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
अशातच शिवतारेंनी या लढतीत उडी घेत तिहेरी सामना करण्याचे प्रयत्न केले होते. परिणामी महायुतीची मतं शिवतारेंना वळून आपल्याला धोका निर्माण होण्याची शक्यता अजितदादांनी हेरली. आधीच दादा आणि शिवतारेंचं विळ्या-भोपळ्याचं नातं. त्यात विधानसभेतील पराभवाचा सूड उगवण्यासाठी शिवतारेंनी दादांविरुद्ध शड्डू ठोकल्याचं चित्र होतं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजितदादा आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई झाली आणि शिवतारेंनी आपलं बंड म्यान केलं होतं.